सोने झाले स्वस्त, चांदीतही मोठी घसरण, जाणून घ्या भाव

 

जाणून घ्या सोन्या चांदीचा भाव.

नमस्कार मंडळी, भारतात सोन्याला असलेली लोकप्रियता नवीन नाही, विशेषत: महिलांमध्ये. आता लग्नसराईचे दिवस जवळ येत असल्याने सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला दिसतो. दिवाळीच्या सणातसुद्धा, किंमती जास्त असतानाही दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसली. सध्या सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुखद बातमी आहे—गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये घट झाली आहे. तर मग, जाणून घेऊया आजचे ताजे सोन्याचे दर.

तर काय आहे भाव ?

1 ग्रॅम सोन्याचा दर


8 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅमचा दर 7,285 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅमचा दर 5,961 रुपये आहे.

10 ग्रॅम सोन्याचा दर


जर तुम्हाला 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला 72,850 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 79,470 रुपये द्यावे लागतील. तसेच 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 59,610 रुपये आहे.

चांदीची किंमत


सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घट पाहायला मिळाली आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर 9,290 रुपये असून, 1 किलो चांदीसाठी 92,900 रुपये मोजावे लागतील. काही दिवसांपूर्वी चांदीची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक होती, परंतु आता ती 100 रुपयांनी कमी झाली आहे.

सोन्याचा भाव कमी होण्याचे कारण:-

अमेरिकी राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकल्यानंतर अमेरिकी शेअर बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. अमेरिकेसह भारतीय सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी घसरण झाली आहे.



Post a Comment

0 Comments