शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी
महत्वाची बातमी
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यात प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ मिळवता येईल. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांमध्ये नोंदणी आणि फायदा मिळवणे सोपे होईल. विशेषतः, न्यूनतम समर्थन मूल्य (MSP), क्रेडिट कार्ड आणि इतर योजनांमध्ये शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी हे ओळखपत्र अत्यंत उपयोगी ठरेल
- आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे
- आधार कार्ड
- आधार कार्डाशी लिंक केलेला मोबाईल नंबर
- सातबारा व आठ अ
- रेशन कार्ड
- शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी पात्र फक्त शेतकरीच असतील आणि ज्याच्या कडे जमीन आहे
अशा प्रकारे ऍग्री स्टॅक फार्मर आयडी योजना शेतकऱ्यांना एक सशक्त ओळखपत्र प्रदान करत आहे, ज्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या विविध योजना व फायदेशीर योजनांमध्ये सहभाग घेता येईल तसेच या ओलखपत्राला युनिक आयडी सुद्धा म्हटले जाते
महाराष्ट्रात शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: #Farmer id registration online apply.
- राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- तिथे उपलब्ध असलेल्या शेतकरी नोंदणी फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
0 Comments