मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये महिना


                 

   नमस्कार राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, आणि त्यासाठी आता प्रचाराची जोरात सुरुवात झालेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नुकतेच महायुतीने कोल्हापूर येथे एक भव्य संयुक्त सभा आयोजित केली. ही सभा 5 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली, आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी दहा महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली.


1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली

तर काय आहेत ते दहा वचणे ?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या 10 मोठ्या घोषणा-

 
  • राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह 2100 रुपये मिळणार. पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
  • प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
  • वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
  • राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
  • 45 हजार पांदण रस्ते बांधणार. (Eknath Shinde )
  • अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
  • वीज बिलात 30 टक्के कपात.
  • शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. (Eknath Shinde )


लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार- एकनाथ शिंदे

ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आता त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आता महिलांचा सन्मान करा, असं माझं सगळ्या भावजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर बहिणींना घरात हात पुढे करावा लागत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Post a Comment

0 Comments